मांडूळ साप देण्याचे आमिष दाखवून दोघांना बोलावून जबर मारहाण
सावर्डे बुद्रुक / वार्ताहर
सावर्डे बुद्रुक ता.कागल येथील माजी सैनिक प्रल्हाद शामराव पाटील (वय ५२) यांचा खून झाला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या अनिल आनंदा निकम यालाही मारहाण झाली असून ते गंभीर जखमी आहेत. सातपुडा पायथ्याशी असलेल्या वडोटा गावात ही घटना घडली आहे.
मांडूळ साप देण्याचे आमिष दाखवून या दोघांना बोलावून जबर मारहरण करण्यात आली. त्यात माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा मृत्यू झाला. तर जखमी निकम यांच्यावर नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेदरम्यान आरोपींनी दोघांकडील १ लाख ६ हजार रुपयेही लुटले आहेत.