वाई/प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने रात्री मांढरदेव घाटात दरड कोसळली होती. दरड कोसळल्याने सकाळपासून मांढरदेवकडे जाणारी व मांढरदेवकडून वाईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागास याची माहिती मिळताच लगेच ती दरड जेसीबीच्या सहाय्याने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मांढरदेवला जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रात्री दरड कोसळली. सकाळी जेव्हा मांढरदेवकडून वाईकडे येणाऱ्या नागरिकांना दरड पडल्याचे निदर्शनास येताच प्रशासनास माहिती दिली. प्रशासनाने लगेच जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवली.दोन तास वाहतुक ठप्प झाली होती.बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम केले.