आमदार दयानंद सोपटे यांची माहिती, आज मांदेत मेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी / पेडणे
भाजपचा मांदे मतदारसंघाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून आजच्या मांदे येथील मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी मांदेतील कार्यकर्त्यांना केले आहे.
निवडणूक जवळ आल्याने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी मांदे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळव्याला कार्यकर्त्यांनी मोठा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मांदे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी मांदे येथे घेतलेल्या पञकार परिषदेत केले.
मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी कार्यकर्ता मेळव्याबाबत माहिती देण्यासाठी मांदे येथे रविवारी पञकार परिषद घेतली. यावेळी व्यासपीठावर मांदे मतदारसंघाचे भाजाप मंडळ अध्यक्ष मधू परब व सरचिटणीस संतोष कोरखणकर उपस्थित .
यावेळी कार्यकर्ता मेळाव्याची माहिती देताना सोपटे म्हणाले, मांदे मतदारसंघातील कार्यकर्ता याचा मेळावा सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता दिनदयाळ भवन मांदे येथे आयोजित केला असून या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत , माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंञी श्रीपाद नाईक, भारतीय जनता पार्टीचे गोवा राज्य अध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार दयानंद सोपटे आदी मान्यवर उपस्थित राहणार राहणार असल्याचे सांगितले . या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी केले.
कार्यकर्त्यांना प्रचार करताना, निवडणूक जिंकण्यासाठी कसे काम करावे , जनसंपर्क मतदारांकडे कसा करावा , संपर्क कसा साधणे, मते वाढण्यासाठी कसे काम करावे . त्यांना आणखीन ज्ञान देण्यासाठी, बुथ यंञणा तसेच मांदे मतदारसंघात भाजपचा उमेदवार परत एकदा निवडून आण्यासाठी कार्यकर्त्यांना काम करताना काय करावे लागणार अशा महत्त्वाच्या बाबींचा वा सूचना याबबत मार्गदर्शन करण्यात येईल. मांदे मतदारसंघाच्या भाजप पक्षाच्या विविध समित्या आहेत त्यात भाजप मंडळ , महिला समिती, युवा समिती , किसान मोर्चा , ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा आणि इतर ज्या सर्व समित्या आहेत त्या सर्व समित्याच्या पदाधिका-याना आणि बुथ समित्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती दयानंद सोपटे यांनी दिली.
कदाचित पार्सेकर सर व्यस्त अणार म्हणून निमंत्रण पञिकेवर नाव घाण्यास विसरले आसणार
आमदार दयानंद सोपटे यांना सोमवारी दि.22 रोजी हरमल येथे सायंकाळी आयोजित केलेल्या राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात निमंञण पञिकेवर नाव न घातल्याने पञकारांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपणास मुद्दाम डावले का असा प्रश्न करीन छेडले असता सोपटे म्हणाले , गोव्याचे माजी मंञी तथा माजी सभापती आणि भाजप पक्षाचे ज्ये÷ नेते राजेंद्र आर्लेकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून निवड करुन उच्चपदावर वर्णी लावून जो सन्मान भाजप पक्षाच्या केंद्रातील नेत्यानी गोवा दिला त्या बद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो. आणि माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. गोव्यासाठी हा मोठा मान असल्याचे सोपटे म्हणाले. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा मांदे मतदारसंघात सत्कार होतो हा भाजपचे माजी मुख्यमंञी पार्सेकर सर यांनी आयोजित केला त्यात आमचा सहभाग असावा असे आपण कार्यकर्त्यांनाही सांगितले असल्याचे सांगून पार्सेकर सर हे कदाचित व्यस्त असणार म्हणून ते आपले नाव कार्यक्रम पञिकेवर घालण्यास विसरले असणार असे सोपटे म्हणाले.