प्रतिनिधी /मोरजी
सरकारी जागेत एखादा प्रकल्प आणून तो खाजगीरीत्या लीजवर देणे ,या सरकारच्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो मांदे येथील सरकारी जागेत होवू घातलेल्या मनोरंजन ग्रामला आमचा तीव्र विरोध राहील. हा प्रकल्प जर स्थानिकाना नको असेल तर स्थानिक आमदार आणि सरकार तो लोकावर का लादतात? असा प्रश्न उपस्थित करून आग्वाद किल्ला पर्यटन आणि मांदे मनोरंजन सिटी यालाही आमचा विरोध असल्याचे गोवा फॉरवर्ड नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले मांदे मतदार संघाचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार दीपक कलंगुटकर यांच्या प्रचार कार्याचा नारळ ठेवण्यासाठी ते रविवारी पार्से येथे आले होते त्यांनतर त्यांनी जुनासवाडा मांदे येथील नियोजित मनोरंजन सिटीच्या जागेची पाहणी केल्यावर पत्रकारांकडे ते बोलत होते .
आमदार विजय सरदेसाई यांनी पुढे बोलताना म्हणाले,गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे सध्या लुट चालू आहे , सरकारच्या जमिनी लीजवर देण्याचा सपाटा लावला आहे . करोडो रुपये खर्च करून आग्वाद किल्याचे सुशोभीकरण केले आहे आता तो किल्ला दृष्टि खाजगी संस्थेला लीजवर देत आहे , शिवाय मांदे जुनासवाडा येथील होवू घातलेला मनोरंजन ग्रामची जागा लीजवर देवून खाजगीकरण केले जाणार आहे , या दोन्ही विषयांना आमचा विरोध आहे .असे विजय सरदेसाई यांनी सांगितले
सरकारच्या जमिनीचा लिलाव करून या सरकारने गोवा विकायाला काढला आहे .ही जागा अजून गोवा विकास महामंडळाच्या ताब्यात सुद्धा नसताना आखण्याचे गणित आमदार सोपटे मांडत आहे , वर्षाचा एक इवेन्ट करण्यासाठी पूर्ण जागा खाजगीरीत्या देणे योग्य नाही , गावाचा विरोध असल्याने आमचाही या प्रकल्पाला विरोध असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले . लोकाना हवा तो प्रकल्प आणा गोयकारपण राखण्यासाठी सत्तेच्या दलालांना हद्दपार करा असे सांगून आपण स्थानिकांच्या बाजूने राहीन अशी ग्वाही डली अशी त्यांनी सुचना केली .
एकाच तालुक्मयात दोन इंटरटेन्मेट झोन कसे ?
आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित करताना मोपा विमानतळ परिसरात यापूर्वीच सरकारने इंटरटेटमेंट झोन जाहीर केला आहे तर मग आता मांदेत कशाला ? एकाच तालुक्मयात दोन झोनची काय गरज ? असा सवाल करून , मांदे येथे मनोरंजन सिटीची गरज नसल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले
यावेळी त्यांनी स्थानिक टेक्सी व्यावसायिकांच्या समस्या एकून घेतल्या गोवा फॉरवर्ड सत्तेवर आल्यास आम्ही स्थानिकांनाच प्राधान्य देवू असे त्यांनी यावेळी सांगितले