पेडणे तालुक्मयात बैलाच्या झुंझीवर लाखो रुपयांचा सट्टा , सरकारी यंञणेला हाताशी धरुन जनावरांच्या रक्तावर आणि जीवावर आनंद उत्सव , पोलीस यंञणेबाबत संशय
प्रतिनिधी / पेडणे
मांदे येथे बैलाच्या झुंजी आयोजित प्रकरणी पेडणे पोलिसांनी प्रज्योत ज्ञानेश्वर मसुरकर, राहणारा पर्रा, गोवा व अजीम अब्दुल्ला मुजावर राहणार कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र यांना अटक करण्यात आली . दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पेडणे पोलिसांनी मांदे दांडोसवाडो येथे बैलाच्या झुंझी आयोजित केल्याबद्दल दोघा जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे.
पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी माहिती देताना सांगितले की बैलांच्या झुंझी आळा घालण्यासाठी दररोजची माहिती गोळा केली जात होती. त्यानुसार आज सकाळी माहिती मिळाली की मांदे येथे बैलाच्या झुंझी आयोजित केली गेली. आणि या झुंझीत एका बैलाच्या मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत झुंझी आयोजित केल्या प्रकरणी
प्राणी झुंझ प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 9 (2) आर / डब्ल्यू घ्झ् 34 आयपीसी आणि कलम 11 (एम) (ग्ग्) (एन) अंतर्गत गुन्हा नोंद करत प्रज्योत ज्ञानेश्वर मसुरकर, राहणारा पर्रा, गोवा आणि अजीम अब्दुल्ला मुजावर, राहणारा कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी यापूर्वीच मृत बैलाचा शोध घेतला आहे आणि दुसऱया बैलाला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले आहे.
पेडणे तालुक्मयात बैलांच्या झुंझीवर लाखो रुपयांचा सट्टा
- पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात बैलांच्या झुंझी आयोजित केल्या जात असून यात बूधवारी एका निष्पाप बैलाचा मृत्यू झाला. या धिरयांवर लाखो रुपयांचा सट्टा लावण्यात येत आला. मागील आठवडय़ातही एक बैल गंभीर जखमी झाला होता. सरकारी यंञणेला आणि कायद्याच्या रक्षण करणाऱयाना हाताशी धरुन या बैलाच्या झुंझी लावण्यात येत आहेत अशी चर्चा सुरु असून अनेकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पेडणे तालुक्मयात आयोजित करत असलेल्या बैलांच्या झुंझीला राजकारणाचा वरदहस्त
- पेडणे तालुक्मयात सध्या प्रत्येक आठवडय़ात धिरयो आयोजित केला जात आसून हे आयोजन राजकीय नेत्याचे कार्यकर्ते करतात आणि राजकारणी व्यक्तींचा त्याना वरदहस्त असल्यानेच सरकारी यंञणाही या प्रकारावर डोळेजाक करत असल्याचे दिसून येते.
धिरयोमध्ये मृत्यू झालेल्या बैलाचे फोटो आणि विडिओ सर्वत्र व्हायरल
- बुधवारी मांदे येथे बैलाच्या झुंझीत एका निष्पाप बैलाचा मृत्यू झाला. याचे विडिओ सर्वञ सोशल माध्यमातून वायरल झाले. जीवाला वेदाना देणारे हे दृश्य पाहून अनेकांचे मन दुःखी झाले. माञ धिरयो प्रेमी या आनंदात सहभागी झाले. जनावरांच्या रक्तावर आनंद घेणारे आणि सट्टा लावणाऱयाना यांना माञ कोणताही प्रकारची पर्वा नसल्याने परत परत असे प्रकार घडत आहे.