पालये वार्ताहर
मांद्रेचे ग्रामदैवत श्री सप्तेश्?वर भगवती प्रमुख पंचायतन देवस्थानातील सुप्रसिध्द कार्तिकी एकादशी सप्ताह बुधवार 25 रोजी साजरा होणार आहे. सप्ताहाची सांगता गुरुवारी सायंकाळी सामुहिक गाऱहाणे घालून होणार आहे.
सप्ताहाला गुरुवारी दुपारपासून प्रारंभ झाला आहे. श्री भगवती मंदिर सभागृहात ’नंदादीपा’समोर रोज अखंडपणे भजन सादर करण्यात येत आहे. साळगावकरवाडा, मेस्तवाडा, मधलामाज, आस्कावाडा, आश्?वे, देऊळवाडा आणि जुनसवाडा पारकरी मंडळांतर्फे परंपरेप्रमाणे चक्रीभजने होत आहेत. रोज सायंकाळी ’दीपमाळ’ साजरी करण्यात येते. यावेळी पणत्या प्रकाशमान करण्यात येतात. यंदा अनेक नामवंत गायक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम दीपमाळेत सादर करण्यात आला.
दरवषी मोठय़ा उत्साहात हा भजन सप्ताह साजरा केला जातो. गायनाच्या मैफलींचे आयोजन केले जाते. मेस्तवाडा, मधलामाज, आस्कावाडा, देऊळवाडा पारकरी मंडळांतर्फे चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यंदा कोरोनामुळे उत्सव सरकारी नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. भाविकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नियम पालन करण्यावर भर दिला आहे.