वार्ताहर /पालये
मांदे येथील ‘साहित्य संगम’चा तीनशे एक्मयाऐशीवा मासिक कार्यक्रम नुकताच देऊळवाडा, मांदे येथे मंडळाचे कार्यवाह प्राचार्य गजानन मांदेकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर साहित्यकि कै.वि.स.खांडेकर यांच्या ‘संगीत रंकाचे राज्य’ या नाटकावर चर्चा करण्यात आली.गजानन मांदेकर यानी स्थानिक स्वराज्य संस्था?मध्ये चालणाऱया भोंगळ कारभारावर प्रकाश टाकणाऱया या नाटकाचे कथानक सूत्ररुपात मांडून, नाटकातील व्यक्तिरेखांचा परिचय करून दिला.या नाटकाच्या मार्मिक भाषेचा प्रत्यय यावा यासाठी त्यानी नाटकातील काही वेचक संवादांचे व सुभाषितवजा वाक्मयांचे वाचन केले.शेवटी त्यानी खांडेकर यांच्या जीवन व साहित्याविषयी सविस्तर माहिती दिली.
1926 साली अठ्ठय़ाण्णव वर्षांपूर्वी लिहिलेल्या या नाटकाचा विषय आजही ताजा वाटतो,हे खांडेकर यांच्या या एकमेव नाटकाचे वैशिष्टय़ असल्याचे मत यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी सदस्यांनी व्यक्त केले.
‘साहित्य संगम’चे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर, सदस्य दिलीप मेथर,शरद गावडे,पांडुरंग गावडे,वैभव ओटवणेकर,रामा गावडे, विवेक वाटवे, गोपाळ सावंत,मानसी शेटमांदेकर, विष्णू शेटगांवकर, प्रभाकर गांवकर, दिलीप हरमलकर, सुशांत गावडे व संध्या आरोलकर या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
जगप्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर, संगीतकार भप्पी लाहिरी, अभिनेता रमेश देव या नुकत्याच दिवंगत झालेल्या कलाकारांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. शरद गावडे यानी स्वागत व प्रास्ताविक केले, तर दिलीप मेथर यानी ऋणनिर्देश केला.