वार्ताहर/ पालये
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे तसेच सेवा सप्ताहाचे औचित्य साधून मांद्रे भाजप मंडळातर्फे दीनदयाळ भवन सभागृह, मांद्रे येथे रक्तदान शिबिर मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, या शिबिरावेळी मांद्रे भाजप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पुष्पांजली वाहण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटनावेळी उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, उपाध्यक्षा एकता चोडणकर, मांद्रे भाजप मंडळाध्यक्ष मधू परब, सरचिटणीस नरेश नाईक, उपाध्यक्षा दीपा तळकर, गोविंद आसगावकर, मांद्रे महिला मोर्चा अध्यक्षा नयनी शेटगावकर, राज्य कार्यकारी सदस्या प्राजक्ता कान्नाईक, हरमल जिल्हा पंचायत उमेदवार अनंत गडेकर, हरमल सरपंच मनिषा कोरकणकर, तुये सरपंच सुहास नाईक, केरी पंचायतसदस्य राजन फरास, मांद्रे पंचायतसदस्य डॅनिस ब्रिटो, मांद्रे पंचायतसदस्य संतोष बर्डे, मोरजी पंचायतसदस्य उमेश गडेकर, आगरवाडा-चोपडे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायतसदस्य प्रमोद गावकर, विर्नोडा पंचायतसदस्य शैलेंद परब, बाबली राऊत, मिलिंद तळकर, उत्तम पोखरे, वामन सावळ, दत्ताराम ठाकूर, सुजय गोकर्णकर, ख्रिस्तोफर फर्नांडिस, धीरज मांद्रेकर, रवी गोवेकर, मंदार म्हामल, सचिन पेडणेकर, विठ्ठल किनळेकर, रामनाथ आरोलकर, देवदत्त बांदेकर, दर्शन राऊत, सुदन नाईक, विवेक राऊत, जयराम नाईक, रुद्राक्ष मुरारी, दामोदर नाईक, सुनिल परब, मंगेश पाळणी, योगेश साळगावकर, अक्षय मोरजकर, सुमित नाईक, रश्मी नारोजी यांची उपस्थिती होती.
रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन दत्ताराम ठाकूर यांनी केले. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्यांना मांद्रे मतदारसंघ भाजप मंडळाध्यक्ष मधू परब यांनी धन्यवाद दिले. तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य दिलेल्या सर्व पदाधिकाऱयांचे आभारही मानले.