वार्ताहर /पालये
आश्वे-मांद्रे येथील भूमिका स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. क्लबच्या सर्व ज्ये÷ व कनि÷ सभासदांनी येथील सरकारी प्राथमिक शाळा परिसर स्वच्छ केला. क्लबचे उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी उपस्थितांना ‘स्वच्छ भारत’ प्रतिज्ञा दिली.
क्लबचे अध्यक्ष सूरज सावंत, खजिनदार दिप्तेश सावंत व ज्ये÷ सभासद किरण सावंत यांनी गांधी, शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश सावंत यांनी केले तर विनीत सावंत यांनी आभार व्यक्त केले.