पेडणे / (प्रतिनिधी )
मांद्रे येथील सिद्धांत उदय गोवेकर या विद्यार्थाने राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेत संपूर्ण देशातून 15 लाख विद्यार्थ्यामधून देशात 1364 वा क्रमांक पटकावला. त्याला देशातील नावाजलेली आरोग्य शिक्षण संस्था एम्स हृषिकेश उत्तराखंड येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे.
पेडणे तालुक्मयातील असा प्रवेश मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. गोव्यातही काही मोजक्मयाच विद्यार्थ्यांना अशा शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला असून आता पेडणे तालुक्मयातील मांदेच्या सुपुत्राने प्रवेश मिळवल्याने संपूर्ण पेडणे तालुक्मयाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
यापूर्वी सिद्धांत याने आपल्या हुशारीची चमक आय.आय.टी आणि जे.ई. ई. मेन्स च्या परीक्षेत भारतातील तेरा लाख विद्यार्थ्यांतून 1105 क्रमांक मिळवत दाखवून दिली होती. दहावीच्या परीक्षेमध्येही आय.सी.एस.ई. बोर्डमध्ये गोव्यात 2018 साली 97.80 टक्के गुण मिळवून राज्यात तो पहिला आला होता. 2020 मध्ये बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत 95 टक्के गुण त्याने मिळवले होते तर जी.सी.ई. टी.च्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता.
सिद्धांत गोवेकर हा ज्ञानप्रसारक उच्च. माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य उदय गोवेकर व सौ. राजश्री गोवेकर यांचा मुलगा असून त्याने मुष्टिफंड आर्यन उच्च. माध्यमिक विद्यालयातून आपले बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच्या निवडीचे गोव्या राज्याच्या विविध भागातून तसेच पेडणे तालुक्मयातून कौतुक होत असून आपला मुलगा एक चांगला डॉक्टर व्हावा अशी सिद्धांतच्या पालकांची इच्छा असून त्यानेही आपल्याला एक चांगला डॉक्टर व्हायला आवडेल, असा मनोदय व्यक्त केला.