वार्ताहर /पालये
आपल्या पाल्यावर लक्ष ठेवताना आपल्यास मित्रत्वाची भावना ठेवायला विसरु नये, असे प्रतिपादन समुपदेक प्रा. स्टेफनी फर्नांडिस यांनी केले.
मांद्रे विकास परिषद मांद्रे येथील सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाच्या वार्षिक सभेत त्या बोलत होत्या.
पालकांनी आपल्या पाल्याशी कसा सुसंवाद साधावा, यासंबंधीही मार्गदर्शन केले तसेच पालकांना विविध उदाहरणे देऊन मोबाईल, वाहन, तसेच अन्य गोष्टींपासून मुलांना दूर ठेवण्यासंबंधी कळवळीचे आवाहन केले.
प्रभारी प्राचार्या सुमिक्षा गावकर यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी निवडण्यात आलेल्या पालक-शिक्षक संघाध्यक्षपदी सेबास्टीना डिसोझा यांची निवड करण्यात आली.
अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणेः उपाध्यक्ष मोहन शेटगावकर, कोषाध्यक्ष दिशा रेडकर, सह कोषाध्यक्ष सदाशिव नाईक, सचिव प्रा. श्री अजय देसाई, सहसचिव प्रा. रामा गोवेकर. सदस्य वासुदेव परब, तारा हडफडकर, हनुमंत शेटगावंकर, निवड प्रक्रिया प्रा. सीताराम आश्वेकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी झालेल्या चर्चेत पालकांनीही सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने केली. स्वागत प्रा. बबीता भिवशेट यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय प्रा. बर्नाडेट रॉड्रिगीस यांनी करून दिला. सूत्रसंचालन पालक-शिक्षक संघाचे सचिव प्रा. अजय देसाई यानी केले तर आभार प्रा. नम्रता देसाई यांनी मानले.