ऑनलाईन टीम / काठमांडू :
जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीबद्दल नेपाळ सरकारने नवीन दावा केला आहे. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावली यांनी म्हटले आहे की, माउंट एव्हरेस्टची उंची 8848.86 मीटर आहे. जी पूर्वीपेक्षा 2.8 फूट जास्त आहे.
2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर असे मानले जात होते की, माउंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर नव्हती, त्यामुळे नेपाळने या पर्वताची उंची मोजण्याची तयारी केली. त्यानंतर आज नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी माउंट एव्हरेस्टच्या अधिकृत उंचीचे वर्णन 8848.86 मीटर असे केले आहे.
नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे माउंट एव्हरेस्टची उंची मोजली. त्यानंतर ही नवीन उंची घोषित करण्यात आली. 2019 मध्येच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेपाळ दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी संयुक्तपणे जगातील सर्वोच्च शिखराची उंची जाहीर करण्याचा करार केला होता.