दोडामार्ग / वार्ताहर:
झोळंबे येथील माऊली दुग्ध उत्पादक व प्रक्रिया मर्यादित संस्थेला वर्षभरात सर्वाधिक दूध देणाऱ्या सभासदांपैकी तिघांना संस्थेने गौरविले. या संस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा गणेशप्रसाद गवस याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हिरबा गावडे, सचिव गुरुदास मणेरीकर, उपाध्यक्ष शिवाजी जोशी, सुखाजी गवस, पांडुरंग गवस, सतिष कामत सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. यावेळी प्रथम क्रमांक महादेव देसाई, द्वितीय क्रमांक हिरबा गावडे, व तृतीय क्रमांक सखाराम गवस यांना संस्थेने बक्षिसे देऊन गौरविले.