वार्ताहर/ धामणे :
देसूर येथील माऊली संघाच्यावतीने मंगळवार दि. 7 रोजी डेंग्यू, मलेरिया, कोरोना व इतर रोगांबाबत जनजागृती व लस देण्याचा कार्यक्रम रमेश गोरल जिल्हा पंचायत आरोग्य व स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातील माऊली संघाच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर, नर्स, अंगणवाडी शिक्षिका आणि आशा कार्यकर्त्या यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार रमेश गोरल यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर डॉक्टर प्रशांत धोंगडी, गिरीश मायान्नावर, आशा कोरे, सुहास पाटील, पी. आर. कुंभार यांनी याप्रसंगी डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया व कोरोना या रोगाबद्दल माहिती देऊन जनजागृती केली.
कार्यक्रमाला रणजीत पोटे, संकेत पाटील, वैभव जोशी, गिरीश गोरे, मोहन नंद्याळकर, प्रसाद पाटील, मनोज शिंदे, विकी खटावकर, विठ्ठल शिंदे, दत्ता नंद्याळकर, प्रकाश येळ्ळूरकर, अशोक डोण्यान्नवर, बसवंत काळसेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दाजीबा गावकर यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, बालक आणि संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.