बेंगळूर : राज्य मागासवर्ग कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी माजी खासदार आणि माजी मंत्री के. जयप्रकाश हेगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिनियम 1995 च्या परिच्छेद 3 व 4(1) अंतर्गत राज्य सरकारने ही नेमणूक केली आहे.
उडुपी जिल्हय़ाच्या पुंदापूर तालुक्यातील कोर्गी गावचे रहिवासी असणारे के. जयप्रकाश हेगडे यांनी उच्च न्यायालयात वकिली केली आहे. 1997 मध्ये त्यांनी मत्स्योद्योग खात्याचे मंत्री म्हणून काम केले होते. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते कारकल मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते उडुपी-चिक्कमंगळूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले. 2012 मधील पोटनिवडणुकीत ते याच मतदारसंघातून निवडून आले होते.