केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील खेळणी आयात वर्ष 2020-21 मध्ये घटून ती 13 कोटी डॉलरच्या घरात पोहोचली असून ती वर्ष 2018-19 च्या कालावधीत 30.4 कोटी डॉलर होती. यामुळे मागील आकडेवारीचा आधार घेत खेळणी आयातीचा आलेख पाहिल्यास तो घसरणीकडे वळत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
यासोबतच देशातील खेळणी उद्योगाला चालना देण्यासोबत त्यांचे संरक्षण करण्यावरही भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. गोयल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ‘मागील तीन वर्षांमध्ये खेळणी आयात ही मोठय़ा प्रमाणात घसरणीकडे वळत असून यामध्ये विविध समूहांमधील हजारो कारागिरांनाही मदत दिली जात आहे.’ असे मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे.