नवी दिल्ली
जगभरात पॉडकास्टचा वापर वेगाने वाढत गेल्याची माहिती आहे. 2020 मध्ये जगामध्ये जवळपास 885,262 नवीन पॉडकास्टचा प्रारंभ झाल्याची न्यूयॉर्क येथे स्थापन असणाऱया पॉडकास्ट ऍनालिटिक्स ऍण्ड अटेंशन कंपनी चॅरिटेबल यांनी दिली आहे. 2019 च्याअनुसार 318,517 तुलनेत जवळपास तीन पट वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मागील वर्षातील मार्च ते एप्रिलपासून जगभरात लॉकडाऊन सुरु झाला होता. या कारणामुळे पॉडकास्ट हा लोकांचा दैंनदिन जीवनाचा एक भाग झाला होता. जो नवीन पॉडकास्ट तयार करण्यासाठी यामध्ये 30 टक्क्यांमधील फक्त एक किंवा दोन एपिसोड होत होते.
काय असतो पॉडकास्ट?
पॉडकास्ट कोणत्याही रेडिओ शो सारखा असतो, म्हणजे बोलून आपली माहिती लोकांकडे पोहोचवली जाते. यात फरक इतकाच आहे, की यामध्ये फ्रीक्वेंसी मॉडय़ूलेशन (एफएम) ची आवश्यकता भासत नाही. याला इंटरनेटच्या मदतीने ऑन एअर केले जाते.