एकूण 3,531 जणांमध्ये 2,061 मुली : शासकीय आकडेवारी, महाराष्ट्राची मोठा हिस्सेदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात 31 मार्च रोजी समाप्त झालेल्या वर्षात एकूण 3,531 मुलामुलींना दत्तक घेण्यात आले असून यात 2,061 मुली सामील आहेत. शासकीय आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक मुलेमुली दत्तक घेण्यात आले आहेत.
केंद्रीय दत्तक-ग्रहण संसाधन प्राधिकरणाच्या (कारा) आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान 1,470 मुले आणि 2,061 मुलींना दत्तक घेण्यात आले आहे. लोकांची मानसिकता आता हळूहळू बदलत असून ते मुलींना दत्तक घेण्यास अधिक स्वारस्य दाखवत आहेत.
सेंटर फॉर ऍडवोकेसी अँड रिसर्च’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालिका अखिला शिवदास यांनी कुणालाही दत्तक घेण्यापूर्वी अशा संस्थेत गेल्यास मुलांपेक्षा तेथे मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येईल असे म्हटले आहे.
बहुतांश कुटुंबांमध्ये मुलांनाच प्राथमिकता दिली जाते आणि ते मुल जन्माला येण्यापूर्वी त्याचे गर्भलिंगदान करणे आणि स्त्राrभ्रूण असल्यास गर्भपाताच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. अनेकजण मुलगी जन्माला आल्यावर तिला सोडून देतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
आकडेवारीनुसार मागीलवर्षी एप्रिल ते चालू वर्षातील मार्चपर्यंत 0-5 वयोगटातील 3,120 मुलांना दत्तक घेण्यात आले. यादरम्यान 5-18 वयोगटातील 411 मुलांना दत्तक घेण्यात आले. आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक 615 जणांना दत्तक घेण्यात आले आहे. याचबरोबर कर्नाटकात 272, तामिळनाडूत 271, उत्तरप्रदेशात 261 आणि ओडिशात 251 मुलामुलींना दत्तक घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात 60 हून अधिक दत्तकग्रहण संस्था असल्याने तेथे हा आकडा अधिक असतो. तर अन्य राज्यांमध्ये सरासरी 20 संस्था आहेत, अशी माहिती अधिकाऱयाने दिली आहे.