ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. बुधवारी देशात पुन्हा एकदा 40 हजारपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात 41 हजार 195 नवे रुग्ण आढळून आले. तर 490 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 20 लाख 77 हजार 706 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4,29,669 जणांनी आपला जीव गमावला आहे.
बुधवारी देशात 39 हजार 069रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 60 हजार 050 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.45 टक्के इतके आहे. सध्या देशात 3 लाख 87 हजार 987 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशातील 52 कोटी 36 लाख 71 हजार 019 जणांना लस देण्यात आली आहे.
- 8 राज्यांमध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध
देशातील 8 राज्यांमध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध सुरू आहेत. यामध्ये हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, मिजोरम, गोवा आणि पाँडेचेरीचा समावेश आहे. येथे मागील लॉकडाऊनप्रमाणेच कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत.