ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी 10 हजार 956 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 396 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 97 हजार 535 वर पोहचली असून, मृतांची संख्या 8498 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 41 हजार 842 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 47 हजार 195 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 97 हजार 648 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 34 हजार 687, तामिळनाडू 38 हजार 726, गुजरातमध्ये 22 हजार 032, मध्यप्रदेश 10 हजार 241, आंध्र प्रदेश 5429, बिहार 5983, राजस्थान 11 हजार 838, उत्तरप्रदेश 12 हजार 088 तर पश्चिम बंगालमध्ये 9768 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.