ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 434 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 4 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 20 हजार 801 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 212 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 20,801 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2288 पोलीस अधिकारी आणि 18,513 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 16 हजार 706 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1754 पोलीस अधिकारी आणि 14,952 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 3883 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 512 पोलीस अधिकारी आणि 3371 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 212 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 22 पोलीस ऑफिसर आणि 190 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.