ऑनलाईन टीम / मुंबई :
देशातील कोरोना संक्रमणाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 33 हजार 750 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 123 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार 846 रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या देशात 1 लाख 45 हजार 582 उपचारार्थ रुग्ण आहेत. आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 95 हजार 407 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 4 लाख 81 हजार 893 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 1700 वर पोहचली आहे.
दरम्यान, रविवारी महाराष्ट्रात 11 हजार 877 कोरोना रुग्णांची नोंद झाली. 2 हजार 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 12 हजार 610 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के इतका झाला आहे. राज्यात 510 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे.