ओटवणे/ प्रतिनिधी-
माजगाव ग्राम देवस्थान निधी समितीच्या अध्यक्षपदी आनंद अर्जुन सावंत, उपाध्यक्षपदी सूर्यकांत राजाराम सावंत तर सचिवपदी विजय गोपाळ माधव यांची निवड करण्यात आली आहे. माजगाव सातेरी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या देवस्थान मानकरी आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत एकमताने या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.
यावेळी देवस्थान कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद सावंत यांनी सातेरीची मनोभावे सेवा करण्यासह सातेरी मंदिराचा धार्मिक दृष्ट्या विकास आणि भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून महेश रामचंद्र सावंत भोसले, रामदास भगवान भोगण, गोविंद बापू चौगुले, मंगेश कृष्णा राठवड, मुकुंद शिवराम घाडी, राजेश नारायण नाटेकर, रामा गोविंद जाधव यांची निवड करण्यात आली आहे.