प्रतिनिधी /काणकोण
गोव्यातून कर्नाटकाला जाणाऱया एका वाहनातील अंदाजे 10 लाख रु. किमतीची भारतीय बनावटीची विदेशी दारू माजाळी चेकनाक्यावर 6 रोजी पकडण्यात आली. विशेष म्हणजे हे वाहन पोळे चेकनाक्यावरून सोडण्यात आले होते. सदर चोरटी दारू व वाहन मिळून एकूण 20.22 लाख रु. किमतीचा हा ऐवज असून या प्रकरणातील वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि दारूसहित वाहन जप्त केले आहे, अशी माहिती माजाळी चेकनाक्यावरील अधिकाऱयांनी दिली.