वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते धावपटू बाँबी मॉरो यांचे शनिवारी वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. अमेरिकन ऍथलेटिक्स संघटनेतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
1956 च्या मेलबोर्न ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करणारे बॉबी मॉरो यांनी पुरूषांच्या 100 आणि 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत तसेच पुरूषाच्या रिलेमध्ये अशी एकूण तीन सुवर्णपदके मिळवून नवा विश्वविक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स क्षेत्रात असा विक्रम करणारे एकूण चार ऍथलीटस् असून त्यामध्ये जेसी ओवेन्स, कार्ल लेविस आणि युसेन बोल्ट यांचा समावेश आहे. 1956 साली मॉरो यांची स्पोर्टस् इलस्ट्रेटेडतर्फे सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आली होती.