नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बुटा सिंग यांचे आज शनिवारी पहाटे वृद्धापकालाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. त्यांनी 1986 ते 89 या कालावधीत गृहमंत्री पद सांभाळले होते. याशिवाय त्यांनी कृषीमंत्री, क्रीडामंत्री व रेल्वेमंत्रीपदही सांभाळले होते. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.