बेंगळूर : काँग्रेस नेते आणि माजी खासदार के. विरुपाक्षप्पा यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसमवेत भाजप पक्षात प्रवेश केला. बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप मुख्यालयात मुख्यमंत्री येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी विरुपाक्षप्पा यांच्या हाती पक्षाचा ध्वज देऊन भाजपमध्ये स्वागत केले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा, विधानपरिषद सदस्य एन. रविकुमार व इतर नेते उपस्थित होते. कोप्पळ लोकसभा मतदारसंघातून विरुपाक्षप्पा यांनी यापूर्वी निवडणूक जिंकली होती. ते विधानसभेवरही निवडून आले होते. रायचूर जिल्हय़ातील सिंधनूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. आता याच जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.