नवी दिल्ली : वरिष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा खासदार चंदन मित्रा यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले आहे. निधनाच्या समयी ते 66 वर्षांचे होते. मित्रा हे द पायोनियरचे संपादक होते. जून 2010 मध्ये ते मध्यप्रदेशमधून भाजपच्या वतीने राज्यसभेवर निवडून आले होते. 2016 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय होते. जुलै 2018 मध्ये मित्रा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Previous Article‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ करणार अंधश्रद्धेवर भाष्य
Next Article ऍपल स्मार्टवॉचला होणार उशीर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.