प्रतिनिधी /पेडणे
मगो पक्षाचे बळ वाढवण्यासाठी आम्ही मगोत प्रवेश करून, पेडणे मतदार संघातून मगोचे उमेदवार राजन कोरगावकर यांना विजयी करू आणि पेडणेच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जनतेने स्थानिक उमेदवार राजन कोरगावकर यांना विजयी करा असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा धारागळचे पंच प्रदीप पेटकर यांनी मगोत कार्यकर्त्यासाहित प्रवेश केल्यानंतर पेडणे येथे केले.
यावेळी पेडणे कार्यलयात आयोजित केलेल्या पक्ष प्रवेशाला उमेदवार राजन कोरगावकर,सरपंच संजय तुळस्कर,जिल्हा सदस्य रंगनाथ कलशावकर,सज्जन कोनाडकर ,माजी सरपंच राजू नर्से व इतर उपस्थित होते.
ड़ यावेळी राजन कोरगावकर यांनी बोलतानाआम्ही स्वाभिमानी पेडणेकर आहोत आणि सुशिक्षित पेडणेकार केवळ पेडणेकरासाठी मतदान करण्यासाठी प्रवेश करत असल्याचे सांगून आता पेडणेकरांचा आवाज विधान सभेत पोचणार असा विश्वास मगो पेडणेचे उमेदवार राजन कोरगावकर यांनी व्यक्त केला. येत्या पिढीसाठी काही तरी नवीन काम करणार असे सांगितले. आम्ही पेडणेकर म्हणून विजयी होणार मगो पक्ष स्थानिक पक्ष आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत आणि पेडणेकर विजयी होताना आम्हाला बघायचा आहे, गेल्या निवडणुकीतही मगोचाच उमेदवार विजयी झाला होता त्याचीच पुनरावृत्ती आता होणार असल्याचा विश्वास राजन कोरगावकर यांनी व्यक्त केला.