कुंभोज / प्रतिनिधी
कुंभोज, ता. हातकणंगले येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री उद्योजक डी. सी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध स्तरातून त्यांचा सत्कार करण्यात आला. गटातटाचे राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे डी. सी. पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून, त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणली होती.
परिणामी त्यांच्या कार्याची दखल अजूनही जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये ताजीतवानी आहे, असे उद्गार माजी जिल्हा परिषद सदस्य शरद कारखान्याचे संचालक रावसाहेब भिलवडे यांनी काढले.केवळ राजकारण न करता राजकारणाबरोबरच एक उत्कृष्ट व्यवसायिक म्हणुनी त्यांनी कमी वेळेत आपले नाव लैकीक केले असून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी डॅम, कॅनल यासारखे प्रकल्प पूर्ण करून त्यांनी उद्योगाला चालना दिली आहे.असे गौरवोद्गार पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या सत्काराला येणाऱ्या प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले.
बाहुबली तालुका हातकणंगले येथे दैनिक तरुण भारत ने डी. सी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित केलेल्या वाढदिवस पुरवणीचे प्रकाशन डी. सी. पाटील, पत्रकार विनोद शिंगे, बाहुबली विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे, सरपंच रवींद्र खोत, जनतारा हायस्कूल चे मुख्याध्यापक दीपक वाडकर, बाहुबली ब्रह्मचर्याश्रम चे कोषाध्यक्ष धनराजजी बाकलीवल, तात्यासो अथणे, पं. जिवेंद्र जडे, अभिषेक पाटील, रवींद्र खोत, के. बी. पाटील, व्ही. सी. पाटील, एस. बी. चौगुले, ए. ए. खाडे, पुरंदर मगदूम, संजय तपासे, एस. एस. पाटील, दीपक वाडकर, दादासो वाडकर, रायचंद हेरवाडे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, अरूण चौगुले, रविंद्र देसाई अध्यापक अध्यापिका श्रावक अजी माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.