वार्ताहर / कुदनूर
कालकुंद्री येथील माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता मारुती पाटील यांना ‘महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते रविवार ५ जानेवारी रोजी या पुरस्काराने इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित इचलकरंजी आणि समाजगौरव शैक्षणिक, सामाजिक बहु उद्दे. संस्था कोल्हापूर यांच्या निवड संयोजन समितीकडून कला, साहित्य, समाज, उद्योग, शिक्षण, युवक, सांस्कृतिक अशा क्षेत्रातील कार्यात असामान्य वाटचाल करणार्या व्यक्तींचा व संस्थांचा गौरव ‘राष्ट्रीय विचार साहित्य संमेलनात’ केला जातो. सुजाता पाटील यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.