दोडामार्ग / प्रतिनिधी:
उसप गावचे दत्ताराम मळीक (वय ९५) यांचे मंगळवारी ०५ ऑक्टो. रोजी रात्री निधन झाले . माजी जि.प.सदस्य चंदु मळीक यांचे ते वडील होत. मळीक गुरुजी म्हणून त्यांचा अनेकांना परिचय होता. जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून सेवा करीत असताना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले होते.