वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचे माजी टेबल टेनिसपटू 68 वर्षीय सुहास कुलकर्णी यांचे कोरोनामुळे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, विवाहित कन्या, जावई, बंधू आणि भगिनी असा परिवार आहे.
काही दिवसापूर्वी प्रकृती नादुरूस्तीमुळे ठाणे येथील कौशल्या हॉस्पिटलमध्ये सुहास कुलकर्णी यांना दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणीत ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर वैद्यकीय इलाज सुरू होता पण रविवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यांचे निधन झाले.