प्रतिनिधी / कोल्हापूर
माजी नगरसेविका श्रीमती इंदिरा यशवंतराव जाधव- कसबेकर वय 87, रा. फुलेवाडी टेंबलाई मंदिर जवळ यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. श्रीमती जाधव यांनी कोल्हापूर नगरपालिकेच्या 1967 च्या पंचवार्षिक निवडणुकीत फुलेवाडी प्रभागातून विजय मिळवला होता. कोल्हापूर नगरपालिकेची महापालिका होण्यापूर्वी जे सभागह अस्तित्वात होते. त्या 1967 ते 1972 या काळातील सभागृहात श्रीमती जाधव यांनी नगरसेविका अर्थात कौन्सिलर म्हणून जबाबदारी पार पाडली होती. स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. महापालिकेचे निवृत्त कर्मचारी आनंदराव जाधव कसबेकर आणि राजू जाधव कसबेकर यांच्या त्या मातोश्री होत तसेच अमर जाधव कसबेकर यांच्या आजी होत.
शेवटच्या सभागृहात तीन ‘कसबेकर’
1967 ते 1972 या कोल्हापूर नगरपालिकेच्या शेवटच्या सभाग्रहात कसबेकर घराण्यातील तीन जण नगरसेवक अर्थात कौन्सिलर होते. त्यामध्ये पुढे पहिले महापौर होण्याचा बहुमान मिळवलेले बाबासाहेब जाधव – कसबेकर, नगरपालिकेच्या शेवटच्या सभागृहातील नगराध्यक्ष जाधव- कसबेकर आणि श्रीमती इंदिरा यशवंतराव जाधव-कसबेकर यांचा समावेश होता .