बेंगळूर/प्रतिनिधी
अतिरिक्त सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टाने माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांना प्रतिष्ठा तोटाल्याबद्दल नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर एंटरप्राइझ (एनआयसीई) लिमिटेडला दोन कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. २०११ मध्ये एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेगौडा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात एनआयसीईने मूळ दावा दाखल केला होता.
देवेगौडा यांनी मुलाखतीत दिलेल्या निवेदनातून एनआयसीईच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असल्याचे म्हणत १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा कंपनीने देवेगौडा यांच्याविरोधात केला होता. दरम्यान कोर्टाने देवेगौडा यांना भविष्यकाळात कुठल्याही माध्यमात, न्यूज चॅनेलमध्ये किंवा जनसंवादाच्या अन्य कोणत्याही माध्यमांसमोर एनआयसीई विरुद्ध निंदनीय विधान करण्यास कायमची बंदी घातली आहे.