ऑनलाईन टीम / नागपूर :
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे स्वीय सचिव राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने नागपुरात निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात मुलगा मुकुल, सून संगीता आणि दोन नातवंड असा परिवार आहे.
राम खांडेकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले होते. 1991 साली जेव्हा राव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर हे त्यांचे सर्वात विश्वासार्ह मानले गेले होते.
राजकारणाबरोबरच खांडेकर यांनी वृत्तपत्र व दिवाळी अंकांसाठी लेखन केले आहे. त्यांच्या शासकीय सेवेतील अनुभव त्यांनी पुस्तकाच्या स्वरुपात मांडले आहेत. 2019 साली ‘सत्तेच्या पडछायेत’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते.