वृत्त संस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रमुख प्रशिक्षक आणि माजी कर्णधार रवी शास्रीच्या प्रशिक्षकपदाच्या इनिंगनंतर आता आखाती प्रदेशात जानेवारी महिन्यात प्रथमच होणाऱया लिजेंड्स क्रिकेट स्पर्धेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शास्त्राrच्या नव्या इनिंगला नव्या वर्षांच्या प्रारंभी सुरूवात होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट क्षेत्रातील माजी क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा पहिल्यांदाच आखाती प्रदेशमध्ये जानेवारी महिन्यात आयोजित केली आहे. विविध देशांचे माजी अव्वल क्रिकेटपटू पुन्हा एकदा या व्यावसायिक लीग क्रिकेट स्पर्धेत परस्पराविरूद्ध उभे राहणार आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे रवी शास्री हे यशस्वी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत त्यांनी भारताला आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून दिल्या आहेत.
लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचे शास्री प्रमुख आयुक्त असतील. या स्पर्धेत भारत, पाक, लंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तसेच क्रिकेट खेळणाऱया अन्य देशांचे माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत तीन संघ राहतील. भारत, आशिया आणि शेष विश्व अशा तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. सदर स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल असा विश्वास स्पर्धा आयोजकांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी विदेशी खेळाडूंच्या शारीरिक तंदुरूस्तीची जबाबदारी स्पोर्टस् सायन्सचे संचालक ऍड्रय़ू लिपस यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.