हैदराबाद
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू एसएस वासिम यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. माजी प्रशिक्षक दिवंगत एसए रहीम यांचे ते पुत्र होते. 70 वर्षीय वासिम हे मतीन म्हणून ओळखले जायचे. त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते तर आंध्रप्रदेश संघाचे त्यांनी कर्णधारपदही भूषविले होते. कस्टम्स व सेंट्रल एक्साईज खात्यात त्यांनी सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. वासिमचे भाऊ व ऑलिम्पिक फुटबॉलपटू एसएस हकीम यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.