लंडन
इंग्लिश फुटबॉल संघातील गोलरक्षक, चेल्सी क्लबचे माजी फुटबॉलपटू पीटर बोनेटी यांचे 78 व्या वर्षी दीर्घकालीन आजाराने रविवारी निधन झाले.
बोनेटी यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीत 729 सामन्यांत चेल्सीचे प्रतिनिधीत्व केले. जवळपास 20 वर्षांच्या फुटबॉल कारकीर्दीत त्यांनी इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत आपला सहभाग सातत्याने राखला होता. इंग्लंडचे ते सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून ओळखले जात त्यांनी सात सामन्यांत इंग्लंड संघाचे प्रतिनिधीत्व केले असून 1966 साली फिफाची विश्वकरंडक स्पर्धा जिंकणाऱया इंग्लंड संघाचे ते सदस्य होते.
इंग्लंडच्या फुटबॉल फेडरेशनतर्फे तसेच चेल्सी फुटबॉल क्लबतर्फे बोनेटी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.