वृत्तसंस्था/ लंडन
‘स्कॉटलंडचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया लिव्हरपूल क्लबचे माजी सदस्य 82 वर्षीय सेंट जॉन यांचे दीर्घ कालीन आजाराने निधन झाल्याची बातमी मंगळवारी लिव्हरपूलच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे.
सेंट जॉन यांनी आपल्या वैयक्तिक फुटबाल कारकीर्दीत 1961-71 या दहा वर्षांच्या कालावधीत लिव्हरपूल संघाकडून 400 सामन्यांत खेळताना 118 गोल नोंदविले. लिव्हरपूल फुटबॉल क्लबतर्फे सेंट जॉन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.