बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमधील महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका रेखा कादिरेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. दरम्यान, कादिरेश यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पथक बेंगळूर शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत.
बेंगळूरमधील माजी नगरसेविका रेखा कादिरेश यांच्या निवासस्थानाजवळ आरोपींनी गुरुवारी चाकूने वार करत त्यांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दोन मोटारसायकल चालविणाऱ्यांनी कादिरेश यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्या फूड पॅकेटचे वितरण करीत होत्या.