शासकीय इतमामात अंतिमसंस्कार. मुख्यमंत्री, सभापतींची उपस्थिती. असंख्य चाहत्यांनी घेतले अंत्यदर्शन
डिचोली/प्रतिनिधी
मये व डिचोलीचे माजी आमदार तथा माजी मंत्री, माजी खासदार सर्वांचे लाडके हरीश उर्फ अण्णा झांटय़े यांच्यावर शासकीय इतमामात पाजवाडा डिचोली येथे त्यांच्या खासगी जागेत अंतिम संस्कार करण्यात आले. पूत्र आमदार.प्रवीण झांटय़? यांनी त्यांना मंत्राग्नी दिला. यावेळी अण्णा यांचे बंधु सुरेश व उमेश झांटय़े व संपूर्ण झांटय़े परिवार उपस्थित होता.
राजकारणात असूनही सर्वांशी सामाजिक आणि जवळचे संबंध राखून ठेवलेल्या अण्णा झांटय़े यांचे शव काल रविवारी सकाळी डिचोली येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सकाळीच असंख्य चाहते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. शव डिचोलीत दाखल होताच लोकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावत अण्णा चे अंत्यदर्शन घेतले. यावेळी लोकांची एकच गर्दी उसळू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. पोलीस उपअधिक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चांगली कामगिरी बजावली.
हरिश उर्फ अण्णा झांटय़े यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, सभापती राजेश पाटणेकर, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री दिपक पावसकर, आमदार फ्रा?सिस सिल्वेरा, ज्योसुआ डिसोझा, ग्लन टिकलो, प्रतापसिंह राणे, विजय सरदेसाई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माज आमदार धर्मा चोडणकर, शंभू भाऊ बांदेकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी आमदार नरेश सावळ, माजी मंत्री दिलीप परूळेकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, गोपाळ सुर्लकर, डिचोली गट काँग्रेस अध्यक्ष मेघश्याम राऊत, माजी जिल्हा शिल्पा नाईक, संजय शेटय़?, वल्लभ साळकर व इतरांची उपस्थिती होती.
राज्याच्या जडणघडणीत मोठे योगदान असलेल्या हरिश उर्फ अण्णा झांटय़े यांनी आपल्या कल्पक आणि समाजाप्रती दानशूर भावना ठेऊन आपले एक वेगळे स्थान लोकांच्या मनात निर्माण केले होते. डिचोली व मयेच्या विकासात अनन्यसाधारण योगदान असलेल्या अण्णानी आपले जिवन सदैव लोकांसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता घालविले. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक स्थरावर त्यांनी केलेले कारँय आजही अनेकांच्या जिवनाला दिशा देणारे ठरले आहे. काजू कारखाने सुरू करून त्यांनी हजारोंच्या संख्येने लोकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली. तसेच झांटय़े महाविद्यालय सुरू करून डिचोली, सत्तरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण जवळ.आणून दिले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगून त्यांना श्रध्दांजली वाहिली.
सभापती राजेश पाटणेकर यांनी यावे, डिचोली व मयेच्या विकासाचे विकासपुरूष असलेल्या अण्णा झांटय़े यांचे डिचोलीवर आणि डिचोलीवासीयांवर अनेक उपकार आहेत. एक दानशूर व्यक्तीमत्व म्हणून आपली वेगळी छबी निर्माण केलेल्या अण्णानी राजकारण हे केवळ समाजकारणाचे माध्यम असल्याचे आपल्या कर्तुत्वातून दाखवून दिले आहे. ते आज या जगात नसले तरी त्यांचे कार्य या समाजात अजरामर राहणार, असे म्हणून श्रध्दांजली वाहिली.
डिचोली शहरात सुरूवातीच्या काळात लोकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सदैव झटणाऱया अण्णानी डिचोलीचा चांगलाच विकास केला. डिचोलीत आज दिमाखात उभे असलेले प्रकल्प अण्णानी आणले. आज त्यामुळेच डिचोलीवासीयांना डिचोलीत चांगली सेवा प्राप्त होत आहे. त्यांच्या जाण्याने एक दुरदृष्टी नेता हरपला आहे, असे माजी आमदार नरेश सावळ यांनी म्हटले.
पाजवाडा डिचोली येथील झांटय़े काजू कारखान्याच्या मागील बाजूस त्यांच्या खासगी जागेत अंतिमसंस्कार पार पडले. डिचोली पोलिसांच्या पथकाने अण्णाना सलामी देत तीन फैरी झाडल्या. विशेप बँडपथकाच्या सहाय्याने अण्णाना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांचे मोठय़ा संख्येने चाहते, मये व डिचोली मतदारसंघातील विविध पंचायतींचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य व इतरांच उपस्थिती होती.