प्रतिनिधी/ पणजी
माजी पर्यटनमंत्री आणि भाजपचे नेते दिलीप परुळेकर यांची प्रकृती काल शुक्रवारी अचानक बिघडली. रक्तदाब अचानक खाली उतरला व त्यांना अस्वस्थ वाटल्यानंतर म्हापसा येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्यांना दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात हलविण्यात आले. त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्याचे वृत्त आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.