प्रतिनिधी / बेंगळूर
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते यु. टी. खादर यांची कार आणि कंटेनर यांच्यात बुधवारी सकाळी अपघात झाला. सुदैवाने यु. टी. खादर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, खादर यांच्या इनोव्हा कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. दावणगेरेनजीक आनुगोडू येथे हा अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी यु. टी. खादर कारने निघाले होते. यावेळी त्यांच्या कारने समोरील कंटेनरला धडक दिली. त्यामुळे कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. मात्र खादर आणि त्यांच्या कारचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. घटनास्थळी एसपी हनुमंतराय यांनी भेट देऊन पाहणी केली.