उंडाळे :
माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
पुरोगामी विचारांचा नेता म्हणून उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख होती. सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली.
12 वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सहकार मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळी 9. 30 वाजता त्यांचे पार्थिव सातारा येथील निवासस्थानातून कराडला आणण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता कराड शेती उत्पन्न बाजार समिती येथे अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. 12.30 ला कराड येथून उंडाळेकडे रवाना होणार असून दुपारी 2 वाजता उंडाळे येथे अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता उंडाळे येथे अंत्यविधी होणार आहे.