ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची पहिली लस टोचून घेतली. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, जे जे रुग्णालयात जाऊन आज मी कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतला. हे वॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, ही माझी सर्वांना विनंती आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील आज जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची पहिली लस घेतली. ते म्हणाले, लसीकरणाची प्रक्रिया फार सोपी असून जे नागरिक पात्र आहेत, त्यांनी न घाबरता लस घ्यावी असे आवाहन केले आहे.