बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी आरोग्य सेवा पुरविताना अडचणी येत आहेत. राज्यात बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता आहे. यापार्श्वभूमीवर कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी मुख्य सचिव पी. रवी कुमार आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांच्यासमवेत राज्यातील कोविड -१९ परिस्थितीबाबत बैठक घेतली. यावेळी सिद्धरामय्या यांनी राज्यातील कोविड-१९ संकटाला तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या आहेत.