बेंगळूर
माजी मुख्यमंत्री आर गुंडुराव यांच्या पत्नी आणि काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्या मातोश्री वरलक्ष्मी (वय72 वर्षे) यांना कोरोनाची लागण झाली होती. मणिपाल इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याचे त्यांच्या सुनेने सांगितले. पतीनिधनानंतर 1996 मध्ये त्यांचादेखील राजकारणात सक्रीय सहभाग होता.