बेंगळूर : माजी राज्यसभा सदस्य के. बी. शाणप्पा यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाच दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपचारासाठी गुलबर्गा येथील जीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. मूळचे ते चित्तापूर तालुक्यातील रावूरचे रहिवासी होते. ‘जनता परिवार नेते’ असे आळखले जाणारे शाणप्पा हे जे. एच. पटेल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यानंतर भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची पहिल्यांदा राज्यसभेसाठी निवड केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शाणप्पा यांनी काँग्रेस प्रवेश करून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे.
Previous Articleआयपीएल स्थगित झाल्यानंतर शहरात गल्ली क्रिकेटचा अवलंब
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.