ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती आणखी खालावली आहे. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
दिल्लीतील लष्करी रुग्णालयात मुखर्जी यांच्यावर उपचार सुरू आहेत. मागील 4 दिवसांपासून त्यांची तब्बेत बिघडली आहे. 9 ऑगस्टला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तसेच त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर 10 ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या प्रकृती आणखी खालावत गेली. ते कोमात असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मुखर्जींवर उपचार करत आहे. मात्र, ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. दरम्यान, मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत आज सोशल मीडियावर उलट सुलट बातम्या येत होत्या. रुग्णालय आणि मुखर्जी यांच्या कुटुंबीयांकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे.